बहीण: एक सुंदर नातं
आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी
कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही
म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार
काळ असू शकत नाही म्हणून कदाचित त्याने
आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण
निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती
पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून
कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण
घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर
आसते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून
देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला
असतो.
भाऊबीज च्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा!

