Tuesday, April 4, 2017

उत्तरप्रदेशात भाजप सरकारची कर्जमाफी जाहीर

कोठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा...? शेतकरी माझा...?
उत्तरप्रदेशात भाजप सरकारची कर्जमाफी जाहीर,
महाराष्ट्रात कधी होणार ?
उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांचं १ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ सरकारनं घेतला आहे. योगी सरकारच्या या निर्णयाचा फायदा तब्बल दोन कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या या निर्णयाचे पडसाद आता महाराष्ट्रातही पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते मग महाराष्ट्रात का नाही असा सवाल केला जात आहे.

No comments:

Post a Comment