Sunday, July 9, 2017

गुरू पोर्णिमा

गुरूूर्ब्रम्हा गुरूर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा ।
गुरुःसाक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ।।

सर्वांना गुरू पोर्णिमेच्या  हार्दिक शुभेच्छा

Monday, May 1, 2017

असा हा आपला महाराष्ट्र दिन...

महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० ला करण्यात
आली. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण
महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ हे महाराष्ट्राचे
प्रमुख विभाग. स्वतंत्र महाराष्ट्र चळवळीने
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.आचार्य अत्रे,
सेनापती बापट, शाहिर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे,
श्रीपाद डांगे, एस. एम. जोशी या व्यक्तिंनी संयुक्त
महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व केले. मोरारजी देसाई व
स. का. पाटील
या नेत्यांनी या चळवळीला दडपण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे आंदोलन अधिकच चिघळले व २१ नोव्हेंबर
१९५५ रोजी पोलिसांच्या गोळीबारात १५
जणांना प्राण गमवावे लागले. जनतेच्या असंतोषाला न
जुमानता सरकारने मुंबई केंद्रशासित
केल्याची घोषणा केली. या निर्णयाने
चळवळीला आणखीनच बळ मिळाले. मोर्चे, सत्याग्रह
सुरु झाले. या चळवळीच्या काळात भारताचे त्यावेळचे
अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी महाराष्ट्रावर होणा-
या अन्यायाच्या निषेधार्थ राजीनामा देऊन चळवळ
अधिक मजबूत केली. या चळवळीत एकूण १०५
जणांना हौतात्म्य प्राप्त झाले.
मुंबईच्या फ्लोराफाउंटन भागात त्यांच्या स्मरणार्थ
'हुतात्मा स्मारक’ उभारले गेले. पुढे सौराष्ट्र, गुजरात,
मराठवाडा, विदर्भ व मुंबई मिळुन एक द्विभाषिक
राज्य स्थापन केले गेले. पण त्याला सर्व जनतेने विरोध
केला. अखेर निवडणुकींना सामोरे जायचे असल्याने
लोकांचा रोष ऒढवून घेऊन चालणार नाही. त्यामुळे
कॉंग्रेस नेतृत्वाने एक पाऊल मागे घेऊन संयुक्त
महाराष्ट्रासाठी ते राजी झाले. पुढे १ मे १९६०
रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मुंबई
राजधानी व नागपुर ही उपराजधानी म्हणून निश्चित
झाली. या स्वातंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते
यशवंतराव चव्हाण. १०५
हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानामुळेच आज आपण मुंबई
महाराष्ट्राची राजधानी म्हणुन पहात आहोत.
असा हा आपला महाराष्ट्र दिन...

मराठी माणसाला काय येत ?

१ मे  महाराष्ट्र दिन
मराठी माणसाला काय येत...?
मराठी माणसाला स्वराज्य उभं करता येतं.
मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते...
मराठी माणसाला भारतीय राज्य घटना लिहिता येते.
मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं.
मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो.
मराठी माणसाला पार्श्वगायनात सम्राज्ञी बनता येतं.
मराठी माणसाला संपूर्ण भारतात पहिली मुलींची शाळा काढता येते.
मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं.
मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं.
मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं.
मराठी माणसाला पहिला Indian Idol बनता येते.
मराठी माणसाला पहिला करोडपती बनता येत.
आवडलं तर शेअर करा !!!!!

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील १०५ हुतातम्यांस मानाचा मुजरा
।।लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी।।

महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा ||

Sunday, April 30, 2017

संयुक्त महाराष्ट्र हवाच.....

छाती पेलून अजुनही उभे आहोत त्या चौकात ,
महाराष्ट्राची कहाणी लीहाली आम्ही खेळूनी रक्तात....

संयुक्त महाराष्ट्र हवाच.....

१ मे, हुतात्मे

एक दुर्मिळ क्षण लढताना हुतात्मे महाराष्ट्रासाठी

१ मे, महाराष्ट्र दिन

भीति न अम्हां तुझी मुळीहि गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा.....

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!!!

Friday, April 28, 2017

अक्षय तृतीया

अक्षय तृतीया

अक्षय तृतीयेचे इतके महत्व काय

वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. मुळात  अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला *साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त* मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात. तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे. (काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन आहे. ) यासाठी ही पर्वणी मध्यान-व्यापिनी धरतात. परंतु श्रीपरशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता, म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी अक्षय्य तृतीया.

*अक्षय्य तृतीया हे व्रत कसे करावे?*
या दिवशी  व्रत करणार्‍याने प्रात:काळी स्नान करुन
नरनारायणासाठी भाजलेले जव अगर गव्हाचे पीठ, परशुरामासाठी कोवळी वाळके आणि हयग्रीवासाठी भिजवलेली हरबर्‍याची डाळ घालून नैवद्य अर्पण करावा. शक्य असल्यास उपवास आणि समुद्रस्नान अथवा गंगास्नान करावे. तसेच जवस गहु, हरबरे , सातु, दहीभात , उसाचा रस दुग्धजन्य पदार्थ ( खवा, मिठाई आदी ) तसेच जलपूर्ण कुंभ, धान्य पदार्थ, सर्व प्रकारचे रस आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तुंचे दान करावे. त्याचप्रमाणे पितृश्राध्द करुन ब्राह्मणभोजन घालावे. हे सर्व यथाशक्ती करण्याने अनंत फल मिळते. या तिथीस केलेले दान, हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते , ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे, असे श्रीकृष्णांनी सांगितल्याचा उल्लेख 'मदनरत्‍न' या ग्रंथात आहे. म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया हे नाव पडले आहे. या दिवशी पितृतर्पण करण्यास न जमल्यास निदान तिलतर्पण तरी करावे, असे आहे.
उन्हापासून रक्षण करणार्‍या छ्त्री जोडा इ. वस्तु दान द्यावयाच्या असतात. स्त्रियांना हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या गौरीचे त्यांना या दिवशी विसर्जन करावयाचे असते. त्या निमित्ताने स्त्रिया हळदीकुंकू करतात.
*अक्षय्य तृतीया या दिवशी काय खरेदी करावे?*
हा धार्मिकांचा उत्सव (सण) आहे. या दिवशी दिलेले दान अगर केलेला जप, स्नान आदी कृत्यांचे फ़ल अनंत असते. सर्वच अक्षय्य (नाश न पावणारे ) होते, यामुळेच या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात. या दिवशी तुम्ही सोने किंवा जड जवाहीर खरेदी करू शकता असे केल्याने त्यात सतत वाढ होत राहते. या दिवशी नवीन वस्त्रे, शस्त्रे, दागदागिने आदि वस्तू तयार करवतात अगर परिधान करतात. तसेच, नवीन जागा , संस्था अगर मंडळे आदी यांची स्थापना , उद्‌घाटन वगैरेही केली जातात. नवीन वाहन खरेदी केले जाते. नवीन संकल्प केले जातात तसेच नवीन व्यवसाय सुरु केले जातात.
थोडक्यात काय तर कोतेही शुभ कर्म या दिवशी चालू केल्यास ते कायम स्वरूपी अक्षय राहते व टिकून राहते.
*अक्षय्य तृतीया या दिवशी कोणते दान द्यावे?*
या तिथीस केलेले दान आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे. म्हणून या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्व आहे. या दिवशी खालील प्रमाणे वस्तू दान केल्यास पुण्य संचय वाढतो. या दिवशी
१) या दिवशी मातीचे माठ किंवा रांजण गोर गरिबांना दान करावेत. (मुख्य म्हणजे अक्षय तृतीया या दिवसापासून माठातील थंड पाणी पिण्यास सुरवात करतात त्याने आरोग्य उत्तम राहते.)
२) या दिवशी आंबे गोर गरिबांना दान करावेत. (मुख्य म्हणजे आंबे खाण्यास सुरवातच अक्षय तृतीया या दिवसापासून करतात त्याने आरोग्य उत्तम राहते. )
३) या दिवशी मिठाई किंवा गोड पदार्थ या दिवशी गोर गरिबांना दान करावेत.
४) या दिवशी वस्त्रे किंवा कापड गोर गरिबांना या दिवशी दान करावेत.
५) या दिवशी विविध प्रकारची झाडांची रोपे खरेदी करून त्यांची आपल्या अंगणात किंवा एखाद्या मंदिरा भोवती किंवा डोंगर माथ्यावर लागवड करावी व पुढे पूर्ण वर्षभर त्यांची निगा राखावी.
६) सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी आपण आपल्या आवडत्या देवतेचे नामस्मरण किंवा मंत्र पठण करावे या दिवशी केलेल्या मंत्र पठणाचे किंवा नाम स्मरणाचे पुण्य अखंड टिकून राहते. मग चला तर या दिवशी आपण मंत्र पठणास किंवा नाम स्मरणास सुरवात करू यात. खालील पैकी कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता.

१) ll ओम नमो भगवते वासुदेवाय ll

२) ll सर्व मंगल मांग्लये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ll
या दिवशी वरील मंत्र म्हटल्याने आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते व तिचा निवास कायम आपल्या घरात राहतो.
*विशेष सूचना - कृपया या दिवशी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढू नये कारण ते देखील अक्षय टिकून राहते.*
वरील लेख आपणास आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात. व हि माहिती आपल्या सर्व मित्रां पर्यंत पोहोचावी या साठी हा लेख सर्वांनी शेअर करावा हि नम्र विनंती !

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

तुम्हा सर्वांच्या आयुष्यात अखंड, अक्षय सुख, समृद्धी नांदो. अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Thursday, April 27, 2017

अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !!

अक्षय तृतीयाच्या आशा आहे
या मंगलदिनी आपल्या जीवनात
नव चैतन्य येवो .....
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद
आणि सुख समाधान घेवून येवोत....
आपल्याला आणि आपल्या परिवाराला
आमच्या कडून अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Sunday, April 16, 2017

आत्मविश्वास

जिद्द आणि आत्मविश्वास
असेल तर
कोणतीही गोष्ट अवघड नाही.

सामर्थ्य

लोकांना त्यांचे खरे सामर्थ्य माहीतच नाही,
लोकांनाच्या शक्तीवर आजून अनेक
पुढारी जगत आहे.

Wednesday, April 12, 2017

कुलभूषण जाधव

कुलभूषण जाधव
यांना फाशी सुनावल्याचा देशभरात निषेध

पाकिस्तानने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशी दिल्यास त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतातील कारागृहांमध्ये असलेल्या पाकिस्तानी गुप्तहेरांना फाशी द्या!

कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा

जिंकू शकत नाही.....

त्यांचीशी तुम्ही कधीच
जिंकू शकत नाही.....

जो तुमच्या आनंदासाठी
हार मानतो.

Monday, April 10, 2017

हनुमान जयंती

अंजनीच्या सुता तुला रामाच वरदानं
एक मुखान बोला
बोला जय जय हनुमान..
हनुमान जयंतीच्या सर्व
भाविक भक्तांना हार्दिक
शुभेच्छा ......
जय श्रीराम जय श्रीराम

Tuesday, April 4, 2017

उत्तरप्रदेशात भाजप सरकारची कर्जमाफी जाहीर

कोठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा...? शेतकरी माझा...?
उत्तरप्रदेशात भाजप सरकारची कर्जमाफी जाहीर,
महाराष्ट्रात कधी होणार ?
उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांचं १ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ सरकारनं घेतला आहे. योगी सरकारच्या या निर्णयाचा फायदा तब्बल दोन कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या या निर्णयाचे पडसाद आता महाराष्ट्रातही पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते मग महाराष्ट्रात का नाही असा सवाल केला जात आहे.

Monday, April 3, 2017

सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!!

प्रत्येकाच्या जीवनात आणि जगण्यात राम येवो।
श्री प्रभु रामचंद्र आपणास अरोग्य बलायुष्य सुख शांती वैभव भरभरून प्रदान करो ही प्रार्थना।
।।जय श्री राम।। ।।जय श्री राम।। ।।जय श्री राम।।

Monday, January 30, 2017

माघ श्री गणेश जयंती

माघ श्री गणेश जयंती महोत्सवच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक
शुभेच्छा....
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना.

॥गणपती बाप्पा मोरया॥
💐💐💐💐💐💐💐💐💐

Thursday, January 26, 2017

प्रजासत्ताकदिवस

राजपथावर महाराष्ट्राच्या रथाचं शानदार संचलन.

Wednesday, January 25, 2017

प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा.

Monday, January 23, 2017

Smart फोन

बदलत्या जगचा परिणाम
जाणवत आहे.
माणस Mad आणि
फोन Smart बनत आहे.